Sunday, November 25, 2018

सुफी संत आणि भारत ....


सुफी संत आणि भारत ....
मध्ययुगात भारतात सुफी साधू संतांचं कार्य खरच गौरवास्पद होते. सुफी परंपरा हे भक्तिमार्गाचेच एक अंग आहे. सुफी साधू संत सांगत : गीता, कुराण बाजूला ठेवा आणि भेदाभेद न करता परमेश्वराला शरण जा, त्या खुदा, परमेश्वराने आपल्याला घडवलं आणि प्रेम करायला शिकवलं, तो प्रेमभावणेचा भुकेला आहे. परमेश्वर, खुदा ही भाषेच्या वैविध्यामुळे वेगवेगळी नावे असली तो एकच आहे आणि त्याचा अंश सर्व प्राणिमात्रांत आहे, परमेश्वराला सर्वजण सारखे आहेत त्यामुळे एकमेकांवर प्रेम करा, सौजन्याने वागा म्हणजे तुम्ही परमेश्वराला प्रिय व्हाल. संपूर्ण भारतात ग्रामीण भागात सुद्धा सुफी परंपरा पसरली होती. आजही ह्या संतांची नावे कथेतून, भक्तीगीतातून आपल्याला ऐकायला येतात.
सुफी ह्या भक्ती संप्रदायाचे मूळ पाच पंथ आहेत...
१) चिस्ती, २) सुहारावर्दी, ३) नक्षबंदी, ४)काद्री आणि ५) शुतारी...
काही प्रमुख सुफी संतांची नावे...
ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती (ख्वाजा गरीब नवाज) अजमेर, निजामुद्दीन औलिया (ह्यांचे नाव दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला दिले आहे ), कुटूंबुद्दीन बखतीयार काकी (कुतुब मिनारला यांचे नाव दिले आहे), मुल्ला नसरुद्दीन, फरीददुद्दीन गंजशकर, सलीम चिस्ती (फतेहपूर सिक्रि), हाजी अली (मुंबई), हाजी अली (दौलताबाद, औरंगाबाद), शमशूद्दीन, हाजीमलंग (मिरज), सुलतान सांगडे (कंधार), शेख मोहम्मदबाबा श्रीगोंदेकर, सादिकशहा (नाशिक), सलाउद्दीन (पुणे), ताजुद्दीन (नागपूर),
सैलानी बाबा (दसक गाव, नाशिक), दस्तगिर बाबा (देवळालीगाव, नाशीक), दिवाणशहावली बाबा, हिंदू यांना मोठाबाब म्हणतात (सोनेवाडी-भोजापुर, सिन्नर, नाशिक), सदृद्दीनबाबा, हिंदू यांना सदोबाबा म्हणतात (साकुरगाव, इगतपुरी, नाशिक) त्यात जगात विख्यात आहेत ते म्हणजे शिर्डीचे साईबाबा व इतरही अनेक सुफी संत आहेत.
आजही ह्या सर्व गावात ह्या संतांच्या मोठ्या जत्रा भरतात तिथे हिंदू-मुस्लिम असा भेद नाही. 'सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा, हमारा, सारे जहासे अच्छा' ही काव्यरचना ज्याची आहे तो कवी इक्बाल पूर्वाश्रमीचा सारस्वत ब्राह्मण होता.
प्रशांत कळवणकर
7020388324

No comments:

Post a Comment