Sunday, November 25, 2018

सुफी संत आणि भारत ....


सुफी संत आणि भारत ....
मध्ययुगात भारतात सुफी साधू संतांचं कार्य खरच गौरवास्पद होते. सुफी परंपरा हे भक्तिमार्गाचेच एक अंग आहे. सुफी साधू संत सांगत : गीता, कुराण बाजूला ठेवा आणि भेदाभेद न करता परमेश्वराला शरण जा, त्या खुदा, परमेश्वराने आपल्याला घडवलं आणि प्रेम करायला शिकवलं, तो प्रेमभावणेचा भुकेला आहे. परमेश्वर, खुदा ही भाषेच्या वैविध्यामुळे वेगवेगळी नावे असली तो एकच आहे आणि त्याचा अंश सर्व प्राणिमात्रांत आहे, परमेश्वराला सर्वजण सारखे आहेत त्यामुळे एकमेकांवर प्रेम करा, सौजन्याने वागा म्हणजे तुम्ही परमेश्वराला प्रिय व्हाल. संपूर्ण भारतात ग्रामीण भागात सुद्धा सुफी परंपरा पसरली होती. आजही ह्या संतांची नावे कथेतून, भक्तीगीतातून आपल्याला ऐकायला येतात.
सुफी ह्या भक्ती संप्रदायाचे मूळ पाच पंथ आहेत...
१) चिस्ती, २) सुहारावर्दी, ३) नक्षबंदी, ४)काद्री आणि ५) शुतारी...
काही प्रमुख सुफी संतांची नावे...
ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती (ख्वाजा गरीब नवाज) अजमेर, निजामुद्दीन औलिया (ह्यांचे नाव दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला दिले आहे ), कुटूंबुद्दीन बखतीयार काकी (कुतुब मिनारला यांचे नाव दिले आहे), मुल्ला नसरुद्दीन, फरीददुद्दीन गंजशकर, सलीम चिस्ती (फतेहपूर सिक्रि), हाजी अली (मुंबई), हाजी अली (दौलताबाद, औरंगाबाद), शमशूद्दीन, हाजीमलंग (मिरज), सुलतान सांगडे (कंधार), शेख मोहम्मदबाबा श्रीगोंदेकर, सादिकशहा (नाशिक), सलाउद्दीन (पुणे), ताजुद्दीन (नागपूर),
सैलानी बाबा (दसक गाव, नाशिक), दस्तगिर बाबा (देवळालीगाव, नाशीक), दिवाणशहावली बाबा, हिंदू यांना मोठाबाब म्हणतात (सोनेवाडी-भोजापुर, सिन्नर, नाशिक), सदृद्दीनबाबा, हिंदू यांना सदोबाबा म्हणतात (साकुरगाव, इगतपुरी, नाशिक) त्यात जगात विख्यात आहेत ते म्हणजे शिर्डीचे साईबाबा व इतरही अनेक सुफी संत आहेत.
आजही ह्या सर्व गावात ह्या संतांच्या मोठ्या जत्रा भरतात तिथे हिंदू-मुस्लिम असा भेद नाही. 'सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा, हमारा, सारे जहासे अच्छा' ही काव्यरचना ज्याची आहे तो कवी इक्बाल पूर्वाश्रमीचा सारस्वत ब्राह्मण होता.
प्रशांत कळवणकर
7020388324

इस्लाम आणि शास्त्र: भाग १


इस्लाम आणि शास्त्र: भाग १
(तटस्थपणे धर्माची चिकित्सा होताना सहजासहजी दिसून येत नाही। हिंदूंच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये त्यांचे सर्वात कट्टर शत्रू कोण, तर ते मुसलमान। साहजिकच प्रतिक्रियाही त्याच स्वरूपाची तिखट असणार। ह्या धार्मिक वादापालिकडे जाऊन आपण इस्लामबद्दल शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा करण्याचा एक प्रयत्न करू)
अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत। त्यात अन्न ही प्राथमिक मूलभूत गरज आहे। साहजिकच मानव संस्कृती जशी जशी उत्क्रांत होत गेली तसा तसा योग्य व पूरक आहाराचा प्राधान्याने विचार केला गेला। मानवाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून भौगोलीक वातावरण, कच्च्या खाद्यसामुग्रीची व त्यावर प्रक्रिया करन्यासाठी लागणाऱ्या साधनांची सहज उपलब्धता, निसर्गाची अनुकूलता, औषधी, पूरक आहार ह्या व इतर गोष्टींचा आहार-विहार शास्त्रात विचार केला गेला जातो। उत्तम व सुदृढ शरीर जे मानवाच्या सुख संपन्नतेचं द्योतक आहे।
भारतातील वातावरण व आहार : दक्षिण भारतातील वातावरण काहीसे उष्ण तर उत्तर भारतातील त्यामानाने सौम्य व अति उत्तरेकडे आत्यंतिक थंड असे आहे। उष्ण वातावरणात जठराग्नी (पचनशक्ती) हा मंद (क्षीण) तर थंड वातावरणात तीव्र (उत्तम) असतो। त्यामुळे दक्षिण भारतीय लोकांच्या आहारात तांदळापासून बनवलेले पचायला हलके असे अन्न असते। मध्य भारतातील लोकांच्या आहारात गव्हाची चपाती (काहीसे जड) व तांदूळ (काहीसे हलके) आशा मिश्र स्वरूपाच्या आहाराचा वापर केला जातो तर उत्तर भारतातील वातावरण त्यामानाने काहीसे थंड असल्याकारणाने दक्षिण भरतीयांपेक्षा काहीश्या जड अन्नाचा त्यांच्या आहारात समावेश असतो।
इस्लामच्या उगमाचे मूळ हे अरबस्थानातले। अरबस्थान म्हणजेच वाळवंट। वाळवंटी प्रदेशातील मुख्य समस्या म्हणजे खाण्यायोग्य वनस्पतींची व पाण्याची कमतरता व दिवसा प्रखर उष्ण तर रात्री अत्यंत थंड असे प्रतिकूल वातावरण। असल्याही वातावरणात जर मानवाला सहज जगायचे असेल तर काही ठराविक आहार-विहार विषयक नियमांचा अंगीकार करणे बंधनकारक आहे।  इस्लाम धर्मात ह्या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे असे दिसते।
आहार : वाळवंटातील जमीन शेतीसाठी अत्यंत निकृष्ठ दर्जाची आहे शिवाय पाण्याची कमतरता। ह्या बाबींमुळे वाळवंटात खाण्यायोग्य वनस्पती सहज उपलब्ध होत नाहीत। साहजिकच खुरटे गवत खाऊन जगणाऱ्या जनावरांचं मांस हा अन्नासाठी एकमेव सहज पर्याय उपलब्ध असतो।
मांसाहार हा पचनासाठी अत्यंत जड। वाळवंटात रात्रीच्या थंड वातावरणामुळे मांस पचनास मदत होते। पण सततचा मांसाहार अनेक व्याधीना जन्म देऊ शकतो। आपल्या पोटातील न पचलेले अन्नाचे कण पोटाच्या तक्रारींना जन्म देतात उदा.पोटात शिल्लक राहिलेल्या (न पचलेल्या) अन्नकणांची सडण्याची क्रिया चालू होते व त्यामुळे वात दोष (gases) निर्माण होतो। वातदोषामुळे तिन्हीही दोष चाळवले जातात व इतरही शारीरिक व्याधी निर्माण होतात।  पचनाच्या तक्रारींवर उपाय म्हणून वैद्यकशास्त्र आपल्याला आठवड्यातून एकदा लंघन करण्याचा सल्ला देतं। लंघन केल्याने प्रदीप्त जठराग्नी हा आपल्या आतड्यातील उरलेले अन्नाचे तुकडेही संपवतो व संभाव्य पोटाच्या तक्रारीना प्रतिबंध करतो। 'पोट हे मनाचा आरसा आहे' हे त्यामुळेच म्हंटले जाते।
इस्लाम धर्मात रमादान (रमजान) महिन्यात महिनाभर उपवास (लंघन) करणे हे पवित्र धर्मकार्य मानले केले गेले आहे। वर्षभराच्या सततच्या मांसाहारावर वैद्यकशास्त्रीय दृष्टिकोनातून हा रामबाण उपाय आहे। ह्या उपवासामुळे पोटात शिल्लक राहिलेले मांसाचे कण जठराग्नी भस्मसात करून टाकतो व त्यायोगे पोटाच्या तक्रारी दूर होऊन त्रिदोषांचे दमण होण्यास प्रभावी मदत होते।
खतना कर्म : खतना म्हणजे सुंता हे एक इस्लाम धर्मातील पवित्र शल्यकर्म आहे। ह्या विधीत पुरुष बालकांच्या लिंगाच्या अग्रभागातील त्वचा शरीरापासून वेगळी केली जाते।
कारण: वाळवंटातील वातावरण हे अत्यंत विषम आहे, दिवसां अतिशय उष्ण तर रात्री थंड। असल्या विषम हवामानात जांघेत व परिसरात मुत्राचा काही अंश राहिल्यास बुरशीचा प्रादुर्भाव (fungal infection) होण्याचा संभव अधिक असतो। खतना ह्या विधीमगाचे शास्त्रीय कारण हेच की जांघ प्रदेशात मूत्राचा अंश शिल्लक रहाता काम नये। जेणेकरून बुरशीच्या प्रदूर्भावास प्रतिबंध होईल। असल्या शल्यकर्माचा उल्लेख हिंदूस्थानच्या इतिहासातील महान शल्यविशारद 'शुश्रुत' याच्या ग्रंथातही आढळतो।
उर्वरित भाग क्रमशः पोस्ट केला जाईल।
शास्त्र हा तर धर्माचा मूळ पाया आहे। त्यामुळे मूळ धर्मशास्त्र  हे कधीही टाकाऊ होत नसतं। त्यांना शाश्वत नियमांचा आधार असतो। स्थलकालपरत्वे काही नियम बदलतात त्याचाही आपण बुद्धिप्रामान्याने स्वीकार करतोच की।
सदर लिखाण हे माझ्या समजूतीप्रमाणे आहे।
...... प्रशांत कळवणकर
7020388324

इस्लामचा भारत प्रवेश : इतिहास खरा-खोटा .... (भारतीयांनी इस्लाम खुशीने स्वीकारला, का?)


इस्लामचा भारत प्रवेश : इतिहास खरा-खोटा .... (भारतीयांनी इस्लाम खुशीने स्वीकारला, का?)
इतिहास मार्गदर्शक असतो याविषयी विद्वानांमध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही किंवा त्याबद्दल तसा वादही नाही, पण हा इतिहास किती खरा अथवा खोटा याबद्दल विशेष चिकित्सा होतांना जनसामान्यांमध्ये सहसा दिसून येत नाही (निदान आपल्या देशात तरी). भारताचा बहुतांश इतिहास हा ज्या काही भारतीयांनी लिहिला तो पूर्वग्रहदूषित किंवा काही विशिष्ट हेतू ठेऊन लिहिला आहे अशी शंका समग्र वाचन केल्यावर जाणवते. तटस्थ इतिहासकारांची संशोधनात्मक पुस्तके ज्यावेळेस आपण अधिकाधिक  वाचतो त्यावेळेस ह्या गोष्टींची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. कदाचित एक ठराविक वर्गाकडे त्यावेळेस लेखणी असल्याचा हा परिणाम असावा. भारताचा एककल्ली, (कू)हेतुपुरस्कर इतिहास लिहिण्याचं सर्वात मोठं श्रेय जाते ते पु. ना. ओक ह्या विकृत लेखकाला.
भारत हा एक विकसनशील देश आहे आणि तो एक दिवस परिपूर्ण विकसित व्हावा ही जनसामान्यांची इच्छा आहे. पण हे स्वप्न केवळ स्वप्नच रहाते की काय? अशी सहज शंका तटस्थपणे इतिहासाची चिकित्सा केल्यावर प्रकर्षाने जाणवते. इंगजांचं राज्य आल्यानंतर काय तो वैज्ञानिक व इतर मुल्य शिक्षणाचा अधिकार सर्व सामान्य वर्गाला लाभला आणि त्यामुळेच राजाराम मोहन रॉय, ज्योतिबा फुले व इतर समाजसुधारकांना इंग्रजांचे भारतावरील राज्य हे ईश्वरीय कृपा वाटू लागली. इंग्रजी शिक्षणाची महती वर्णन करताना राजाराम मोहन रॉय म्हणतात की 'इंग्रजीचे शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध'. आज आपल्याला ह्या गोष्टींची प्रचिती येत आहे.
वाचनामूळे होतो सत्य असत्य भेद....
आजही आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण त्यामानाने खूप कमी आहे. केवळ लिहिता वाचता आलं म्हणजे साक्षर असं म्हणणंही एक अर्थाने संयुक्तिक होणार नाही. आपल्या देशातील लोकांमध्ये आज वाचन संस्कृती रुजवणं नितांत गरजेचे आहे. सर्वंकष वाचनाने माणूस सर्वांगाने समृद्ध होतो कार्यकारण भाव लक्षात घेऊन तो नकळत चिकित्सा करू लागतो व जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हा अधिकाधिक सकारात्मक व व्यापक होतो, त्याला नितीमूल्यांची जाणीव होते. शे-दीडशे वर्षांपासून आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला पण त्याची कमतरता मात्र मागील वीस-पंचवीस वर्षांपासून प्रकर्षाने जाणवू लागली. जागतिकीकरणामुळे लोकांना शिक्षणाचं महत्व समजू लागलं आहे.
इंग्रजांच्या कारकिर्दीत सर्व सामान्य वर्गाला शिक्षणाचा अधिकार मिळाल्यानंतर भारतीय माणसाला त्याच्या निसर्गदत्त अधिकाराची तसेच खऱ्या आणि खोट्या इतिहासाची जाणीव होऊ लागली. तत्पुर्वीचा इतिहास हा एक ठराविक वर्गाकडून त्यांच्या सोयीसाठी, हेतुपुरस्कर लिहीला गेला होता.
मुस्लिम द्वेष....
 एक वर्गाने सर्व हिंदूंसमाजामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांविषयी प्रचंड विष पेरून ठेवले आहे, ते म्हणजे 'मुस्लिम राज्यकर्ते अत्यंत क्रूर, त्यांनी तलवारीच्या जोरावर बळजबरी हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले, हिंदूंची मंदिरे उध्वस्त केलीत, गाईंची मोठ्याप्रमाणावर कत्तल करून हिंदूंच्या भावना दुखावल्या' वगैरे वगैरे. आजही ह्या गोष्टींबद्दल हिंदूंच्या मनात कुठलाही संदेह नाही आहे. पण जर मी असं म्हटलं की हा इतिहास पूर्णतः खरा नाही! तर मला शेकडा नव्यांनव टक्के हिंदू वेडं ठरवतील. साहजिकच मला त्यांच्या भावनेचा आदर करून त्यांच्या भ्रमाचं निराकरण करणं आवश्यक आहे.
हिंदुस्तानात पहिला परकीय मुस्लिम शासक......
दिल्लीवर सर्व प्रथम जो मुस्लिम शासक आरूढ झाला तो म्हणजे मोहम्मद घोरी. ११९२ च्या युद्धात मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात तराई येथे जे युद्ध झाले त्यात पृथ्वीराज चौहान याचा पराभव झाला. मोहम्मद घोरीने त्याचा गुलाम कुतबुद्दीन ऐबक याच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवून तो परत अफगाणिस्तानात निघून गेला. अफगाणिस्तानात १२०६ ला घोरीची हत्या झाली, ह्या संधीचा फायदा घेऊन कुतबुद्दीन ऐबक याने दिल्लीची सत्ता काबीज केली व दिल्लीचा पहिला परकीय मुस्लिम शासक बनला.
इस्लामचा भारतात प्रवेश (केव्हा व कुठे) .....
 साहजिकच आपल्या इतिहासकारांच्या मतानुसार इ स ११९२ नंतर इस्लाम धर्म भारतात आला असला पाहिजे ! पण खरा इतिहास तर वेगळाच आहे. इस्लाम धर्म भारतात मोहम्मद पैगंबर जिवंत असतानाच आला आणि तो ही त्या राज्यात जिथे मुस्लिम शासक कधीही नव्हता. ते राज्य म्हणजे दक्षिण भारतातील केरळ हे राज्य. भारतातील पहिली मस्जिद 'चेरामन जुम्मा मस्जिद' इ स ६२९ मध्ये केरळ राज्यात थ्रीसुर जिल्ह्यात अस्तित्वात आली. मलिक दिनार ह्या अरबी धर्मप्रसारकाने ही मशीद बांधली. सौदी अरबियातून व्यापारासाठी व्यापारी केरळात येत असत, ते व नव्याने ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला त्यांना नमाज अदा करण्याकरिता ही मशीद बांधण्यात आली. मोहम्मद हे इ स ६३२ मध्ये पैगंबरवासी झालेत.
भारतात इस्लाम धर्माचा प्रसार हा सूफी साधुसंतांकडून मोठ्या प्रमाणात झाला. कोणत्याही परकीय मुस्लिम बादशहाने अथवा राजाने इस्लाम धर्म प्रसारासाठी विशेष योगदान दिले नाही. ते सर्व सत्तेसाठी लढले.
 हल्दीघाटी युद्ध (धर्म का सत्ताकारण)......
अकबर व राणाप्रताप यांच्यात झालेले सर्वश्रुत हल्दीघाटीच्या युद्धाचं उदाहरण घेऊ. हल्दीघाटीचे युद्ध हे हिंदूधर्मीय विरुद्ध मुस्लिमधर्मीय राजा यांच्यातले झालेले धर्मयुद्ध असे रंगवण्यात आले परंतु प्रत्यक्षात हे धर्मयुद्धच नव्हते हे युद्ध केवळ आणि केवळ सत्तेसाठी झाले. हल्दीघाटीच्या युद्धात प्रत्यक्ष अकबर लढला नाही तर त्याच्यावतीने मानसिंग हा हिंदू राजपूत राजा लढला तर राणाप्रतापच्या वतीने त्याचा सेनापती हकीम खान सूर लढला. इथे दोन्हीकडे हिंदू आणि मुस्लिम एकत्र होते मग धर्मासाठी युद्ध झाले हा सूर का आळवला जातो? असो हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
औरंगझेबाकडून काशीचे मंदिर उध्वस्त...
काही दिवसांपूर्वी भा जा पा सरकारने दिल्लीत एक रस्त्याचे 'औरंगझेब रोड' हे नाव बदलून 'अब्दुल कलाम रोड' असे केले. साहजिकच भाजपा सरकार आल्यावर असे बदल होणार हे अपेक्षितच होतं. मुस्लिम राज्यकर्त्यांनीच लोकांना तलवारीचा धाक दाखवून धर्मांतर घडवून आणले ह्या सनातन्यांच्या अपप्रचाराला छेद जाऊ नये म्हणून हा प्रयत्न. बादशहा औरंगझेब हा अत्यंत क्रूर होता, त्याने अनेक हिंदू मंदिरे उध्वस्त केलीत, हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार केलेत वगैरे वगैरे माहिती आपल्याला इतिहासातून मिळते परंतु प्रत्यक्षात हा इतिहास संपूर्ण खरा नाही! काही घटना खऱ्या असतीलही पण त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे.  औरंझेबाने काशी विश्वेश्वराचे मंदिर उध्वस्त केले ही गोष्ट खरी आहे पण का हे मात्र सविस्तर सांगितले गेले नाही.
काशीविश्वेश्वर मंदिर घटना....
श्री पट्टाभी सितारामैय्या ज्यांनी १९४२ च्या 'चाले जावं' आंदोलनात सक्रिय सहभागी घेतला होता, सितारामैय्या ह्या घाटनेबाबत आपल्या पुस्तकात काय लिहितात हे जाणणे गरजेचे आहे. एकदा बादशहाऔरंगझेब हा आपल्या सैन्य व तब्बल ४४ राण्यांसह पटण्याहून कोलकात्याला चालला होता. प्रवासा दरम्यान त्यांचा एक मुक्काम काशी क्षेत्री झाला. बादशहाच्या सैन्यात अनेक हिंदू राजे व सैन्यही होते.  राण्यांच्या इच्छेनुसार त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या, ज्यावेळेस सर्व राण्या माघारी आल्या त्यावेळेस असे निदर्शनास आले की ४३ राण्याचं आल्यात. बादशहा औरंगझेब संतापला, त्याने काही अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना राणीला शोधण्याची आज्ञा केली. ज्यावेळेस त्यांनी शोध घेतला त्यावेळेस त्यांच्या असे निदर्शनास आले की काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या तळघरात राणी नग्न अवस्थेत बेशुद्ध होती. तिच्यावर मंदिराच्या एका पंडिताने कुकर्म केले होते. साहजिकच ही गोष्ट अतीव संतापजनक होती. बादशहा बरोबर जे हिंदू राजे होते त्यांनी बादशहाला सांगितले की आता हे मंदिर अपवित्र झाले आहे, ते उध्वस्त करण्याखेरीज पर्याय नाही.
बादशहाच्या मंदिरांना देणग्या....
वरील घटणे बाबत विचार केल्यास कदाचित असेही वाटू शकते की ह्या घटनेत कितपत तथ्य आहे. बरं हे लिहिणारा कोणी मुस्लिम धर्मीय माणूसही नव्हता तर सितारामैय्या हे आंध्र प्रदेशातले हिंदू व स्वातंत्र्य सेनानी होते. बादशहा औरंगझेब हा मंदिर उध्वस्त करणारच होता तर त्याने त्याच्या कारकिर्दीत केवळ मंदिरे उध्वस्त करावयास हवी होती उलटपक्षी औरंगझेबाने कामाख्या मंदिर, गोहाटी (आसाम), बालाजी मंदिर, चित्रकूट (उत्तर प्रदेश), महाकलेश्वर मंदिर, उज्जैन (मध्य प्रदेश) व इतरही अनेक मंदिरांना जीर्णोद्धार व देखभालीसाठी मोठ्या रकमा बहाल केल्या होत्या. तत्कालीन बादशहा व राजे यांच्यात धर्मकारणापेक्षा सत्ताकारण महत्वाचे होते.
हिंदुस्तानवासीयांनी इस्लाम का स्वीकारला?....
इस्लाम धर्माचा सर्वात प्रथम प्रवेश केरळ राज्यात झाला, मात्र केरळात कधीही मुस्लिम शासकाने राज्य केले नाही. इस्लामचा भारतात प्रवेश मुख्यत्त्वे मुस्लिम साधू संतांच्या मार्फत झाला तर राज्यकर्त्यांमार्फत नव्हे! इ स ६२९ मध्ये थ्रीसुर जिल्ह्यात 'चेरामन जुम्मा' ही पहिली मस्जिद अस्तित्वात आली. तत्पूर्वी हिंदुस्थानातील जनता कर्मकांड, उच-नीच ह्या अनैतिक भेदाने अक्षरशः गांजली गेली होती. सनातन धर्माचे ब्राह्मण हे एकमेव ठेकेदार उरले होते. ब्राह्मण ब्राह्मणेतरांना क्षुद्र समजत. वर्ण व्यवस्था लोप पाऊन जातीव्यवस्था मजबूत झाली होती. ब्राह्मणेतरांना हीन दर्जाची वागणूक मिळत असे. अशावेळेस मुस्लिम साधू संतांची शिकवण ब्राह्मणेतर वर्गाला जवळची वाटू लागली. साहजिकच खूप मोठ्या प्रमाणावर हिंदुस्तानवासीयांनी इस्लाम धर्म आनंदाने स्वीकारला. ही बाब म्हणजे तत्कालीन ब्राह्मणांच्या वर्चस्ववादावर अवतरलेलं संकटच होते. साहजिकच त्यांनी सर्वांगाने इस्लाम धर्माची निंदा सुरू केली.
सुफी संत आणि भारत ....
मध्ययुगात भारतात सुफी साधू संतांचं कार्य खरच गौरवास्पद होते. सुफी परंपरा हे भक्तिमार्गाचेच एक अंग आहे. सुफी साधू संत सांगत : गीता, कुराण बाजूला ठेवा आणि भेदाभेद न करता परमेश्वराला शरण जा, त्या खुदा, परमेश्वराने आपल्याला घडवलं आणि प्रेम करायला शिकवलं, तो प्रेमभावणेचा भुकेला आहे. परमेश्वर, खुदा ही भाषेच्या वैविध्यामुळे वेगवेगळी नावे असली तो एकच आहे आणि त्याचा अंश सर्व प्राणिमात्रांत आहे, परमेश्वराला सर्वजण सारखे आहेत त्यामुळे एकमेकांवर प्रेम करा, सौजन्याने वागा म्हणजे तुम्ही परमेश्वराला प्रिय व्हाल. संपूर्ण भारतात ग्रामीण भागात सुद्धा सुफी परंपरा पसरली होती. आजही ह्या संतांची नावे कथेतून, भक्तीगीतातून आपल्याला ऐकायला येतात.
सुफी ह्या भक्ती संप्रदायाचे मूळ पाच पंथ आहेत...
१) चिस्ती, २) सुहारावर्दी, ३) नक्षबंदी, ४)काद्री आणि ५) शुतारी...
काही प्रमुख सुफी संतांची नावे...
ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती (ख्वाजा गरीब नवाज) अजमेर, निजामुद्दीन औलिया (ह्यांचे नाव दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला दिले आहे ), मुल्ला नसरुद्दीन, फरीददुद्दीन गंजशकर, सलीम चिस्ती (फतेहपूर सिक्रि), हाजी अली (मुंबई), हाजी अली (दौलताबाद, औरंगाबाद), शमशूद्दीन, हाजीमलंग (मिरज), सुलतान सांगडे (कंधार), शेख मोहम्मदबाबा श्रीगोंदेकर, सादिकशहा (नाशिक), सलाउद्दीन (पुणे), ताजुद्दीन (नागपूर), सैलानी बाबा (दसक गाव, नाशिक), दस्तगिर बाबा (देवळालीगाव, नाशीक), दिवाणशहावली बाबा, हिंदू यांना मोठाबाब म्हणतात (सोनेवाडी-भोजापुर, सिन्नर, नाशिक), सदृद्दीनबाबा, हिंदू यांना सदोबाबा म्हणतात (साकुरगाव, इगतपुरी, नाशिक) त्यात जगात विख्यात आहेत ते म्हणजे शिर्डीचे साईबाबा व इतरही अनेक सुफी संत आहेत.
आजही ह्या सर्व गावात ह्या संतांच्या मोठ्या जत्रा भरतात तिथे हिंदू-मुस्लिम असा भेद नाही. 'सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा, हमारा, सारे जहासे अच्छा' ही काव्यरचना ज्याची आहे तो कवी इक्बाल पूर्वाश्रमीचा सारस्वत ब्राह्मण होता.
आद्य शंकराचार्यांनी सुद्धा प्राचीन वैदिक संस्कृती टिकावी म्हणून भरपूर प्रयत्न केलेत. परंतू आपण पुन्हा सामाजिक भ्रष्ट व्यवस्थेचे बळी ठरलो.
न जात्या ब्राह्मनाश्च्यात्र्य क्षत्रिय, वैश्य एवच
न क्षुद्र नच वा म्लेंच्छ भेदीता गुंणकर्मेभि:।
--- आद्य शंकराचार्य (शंकरनिती)
अर्थ : जातीने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र अथवा म्लेंच्छ -  (म्लेंच्छ म्हणजे परदेशी किंवा ह्या व्यवस्थे बाहेरचा ) ठरत नाही, तर तो त्याच्या गुणकर्माने ठरतो ...
ब्रह्म ऋषी वशीष्ठ (ज्यांनी ऋग्वेदाचा एक अध्याय लिहिला होता) त्यांची आई गणिका होती, "वैशेषिक" शास्त्रकार कणाद ऋषींची आई जातीने क्षुद्र होती, पाराशर ऋषींची आई जातीने कोळी होती, सत्यकाम जाबालीला त्याच्या वडीलांबद्दल तर माहितीही नव्हती इतरही अनेक उदाहरणे आहेत जे जातिवादाचा बुरखा फाडतात, मानवाचे गुणकर्मच त्याला श्रेष्ठ बनवतात मग तो कोणत्याही जातीत जन्माला येवो ....
प्रशांत कळवणकर
7020388324

हिंदू धर्म एक चिकित्सा ..

हिंदू धर्म एक चिकित्सा ..

हिंदु समुदाय हा मुळातच विखुरलेला, दिशाहीन आणि गोंधळलेला आहे. याचाच फायदा स्वतःला धर्माधिकारी समजणारे स्वार्थी लोक घेतात. इतर धर्माचा द्वेष करण्यापेक्षा माझ्या धर्मात काय कमी आहे? याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.

स्वातंत्र्यपूर्व काळात एक राष्ट्रीय अस्मिता म्हणून हिंदू ह्या शब्दाचा धर्म म्हणून झालेला वापर हि तत्कालीन गरज होती, पण हिंदू हा धर्म नाही हे सत्य जास्तकाळ लपून राहू शकत नाही. वेद, उपवेद, ब्राह्मणे, पुराणे, आरण्यके, स्मृतिग्रंथ, उपनिषदे सहा शास्त्रे, रामायण व महाभारत ह्या साहित्यात हिंदू ह्या शब्दाचा सुध्दा साधा उल्लेख देखील नाही. भारतीय भाषा व उप भाषा यामध्येही हिंदू ह्या अर्थाचा शब्द नाही.

 हिंदूंचा कोणताही धर्मग्रंथ नाही. आता ज्ञानेश्वरीच्या सुरवातीला जे गणपतीचे सहा हात म्हणजे सहा शास्त्रे सांगितली ती म्हणजे वैशेषिक, न्याय, मीमांसा, सांख्य, योग आणि वेदान्त आता यातील पहिले शास्त्र कणाद मुनींचे 'वैशेषिक' व कपिल मुनींचे 'सांख्य' शस्त्रे हे देव मानत नाहीत तर बाकीचे शास्त्र देव मानतात. म्हणजे कुठलीही एक ठराविक philosophy नाही आहे. वेद लिहिणाऱ्या आर्य लोकांना मूर्तिपूजा मान्य नव्हती पण आज असंख्य मंदिर व मूर्त्यांचे स्तोम माजले आहे. वैदिक हा मूळ धर्म मानला तर मग एकही मंदिर असायला नको. पण जो वेदवाचस्पती म्हणून बिरुद लावून फिरतो तो गणेश याग यज्ञ कसा करतो. इतिहास बघितला तर गणपती ही संकल्पना इस नंतर चवथ्या ते सहाव्या शतकात 'गुप्त' काळात आली. तर गणेश पुराण, मुद्गल पुराण व अथर्वशीर्ष यांची रचना नवव्या ते तेराव्या शतकात झाली. परंतु हा गजानन ईस पूर्व चवथ्या ते आठव्या शतकात व्यासांनी सांगीतलेले महाभारत कसे लिहितो.

आतापर्यंत ह्या हिंदुभूमीत लिखाण झालेले सर्व ग्रंथ एकत्र करायचे आणि त्याला सरळ हिंदू धर्म म्हणायचे ही चुकीची खेळी आहे. बरं हिंदू नावाने जर एकत्र आलो आहोत तर मग एक धर्मग्रंथ तरी बनवा. ज्याला पूर्ण भारतीयांची मान्यता असेल. तसे प्रयत्न होणार नाहीत कारण जाती व्यवस्था आणि अहंगंड इतका रुजलाय की एक ना एक दिवस हिंदू  भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही. इथे प्रत्येकाला आपली जातीचा वृथा अभिमान आहे. मराठ्यांच्या पूर्वजांनी पराक्रम केला पण ते आजही स्वतः पराक्रमी असल्याच्या ऐटीत वावरताहेत. इतर जातीचे आप आपल्या छोट्या छोट्या संघटना करून आपल्या हक्कासाठी भांडताहेत. काही दलितांची परिस्थिती सुधारली तरी त्यांना दलित म्हणून घेण्यात अभिमान वाटतो आता दलित ही अवस्था ना राहता जात बनली आहे,  बरं ह्या प्रत्येकाने आपला brandambasaador बनवला आहे. छत्रपती हे राजे होते, प्रजाहितदक्ष होते आणि राजाला जात नसते, त्यामुळे त्यांचा जातीशी संबंध येतच नाही, पण मराठ्यांनी  त्यांना आपल्या जातीचा brandambassador बनवलाय. सावित्रीबाईं व ज्योतिबा फुले हे द्वयी स्त्रीशिक्षणाच्या झटले, मानव उद्धारासाठी झटले, केवळ माळी समाजासाठी नाही, पण माळी समाजाने त्यांना आपला brandambassador बनवलंय, आंबेडकरांनी दलितोद्धारासाठी काम केलं त्यांनी दलित ही अवस्था बदलावी म्हणून काम केलं पण घटना ही देशातल्या सर्व नागरिकांसाठी लिहिली. त्यात सर्वांचे हित बघितलं मग आंबेडकर केवळ एक समूहाचे कसे काय होऊ शकतात.

ह्या सर्वांचा कारण म्हणजे आपण धर्महीन आणि दिशाहीन आहोत. आपण मूठभर स्वार्थी लोकांच्या कटास बळी पडलो आहोत. मी, आंबेडकरांनी धर्मांतर केलं असं म्हणत नाही तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण धर्मांतर म्हंटल्यावर आधीचाही एखादा धर्म हवा, पण हिंदू हा तर धर्म नाही. मग जो धर्म सर्वांना समानतेची वागणूक देत नाही तो कसला धर्म? बरं ह्या स्वार्थी लोकांनी रामायण, महाभारत ह्या कथा इतक्या प्रभावीपणे बिंबवल्यात की त्या कथा ही गोष्ट कोणी मानायलाच तयार नाहीत. आई सी एस इ च्या नववीच्या पुस्तकात वाल्मीकीचा काळ हा इस. पूर्व पहिल्या शतकातला दिला आहे, म्हणजे रामायणाची निर्मिती ही त्याच काळातली असणार. बरं हनुमान लहानपणी सूर्य गिळायला जातो, तो सुर्याएव्हढा मोठा होतो व अनु एवढा सूक्ष्म होतो, शिवाय तो वानर जातीचा असतो, त्याला डोंगर उचलून उडण्याऐवढी ताकत असते असल्या गोष्टीवर ही अशिक्षित जनता सहज विश्वास ठेवते, त्यांना त्याची चिकित्सा करावीशी नाही वाटतं. आता नाशिकमधल्या एखाद्या माणसाला विचारलं की हनुमानाचा जन्म कुठे झाला तर तो क्षणाचाही विलंब न करता सांगतो की अंजनेरीला झाला, कारण त्याला तेवढंच माहिती आहे. पण मग शोध घेतला तर चूरू(राजस्थान), हम्पी (कर्नाटक) असल्या अनेक ठिकाणी तुम्हाला हनुमान जन्म स्थळ म्हणून माहिती मिळेल. रामायणाच्या माघे काही गुढार्थही असेल पण मग त्याचा तरी शोध लोकांनी घ्यावा. उगाच जशी आहे तशी कथा सत्य मानून का चालता? त्यामुळे रामाचा जन्म अयोध्येला झाला यावर सामान्य लोकांचा सहज विश्वास बसतो. राम हे कथेतील एक पात्र आहे याचा जनता विचार देखील करत नाही.
छत्रपतींनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदू धर्म स्थापनेची शपथ घेतली असती तर त्यांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान कसे असते, तेहतीस अंगरक्षकांपैकी बारा हे मुसलमान कसे असते, बाबा याकूत त्यांचे धर्मगुरू कसे असते, राज्याभिषेकाला गागाभट्टाना काशीहून बोलावण्याची गरज का होती. त्यांनी कधीही जाती धर्माचा पुरस्कार केला नाही. त्यांची राजनीती सर्वांना सामावून घेणारी होती.

 उत्तर वैदिक काळापासून मात्र एक वर्ण परंपरा होती, पण ती सर्व हिंदुस्थानला समानता घेऊ शकली नाही व कालांतराने ती परंपरा कर्मानुसार नव्हे तर जन्मानुसार झाली,  ठराविक लोकांनी भय दाखवून स्वार्थासाठी तिचा वापर केला. यात यजुर्वेद ब्राह्मण वर्ग प्रामुख्याने आहे.  ऋग्वेदी ब्राह्मण वर्ग मात्र शिक्षण व इतर क्षेत्रात प्रामुख्याने आहे, त्यांना फक्त आपल्या जात श्रेष्ठत्वाचा अभिमान आहे.  हिंदू हा धर्म म्हणून मागच्या दीडशे वर्षांपासून मिरवला जात आहे.

हिंदू हा सिंधू ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. झेंद अवेस्ता ह्या पारशी लोकांच्या ग्रंथात "स" ह्या शब्दाचा वापर "ह" असा केला गेला आहे. आर्य आणि झरतुष्ट हे मूळ एकाच ठिकाणाहून आलेले त्यामुळे बरेच संस्कृत शब्द झेंद अवेस्ता ह्या ग्रंथात आले आहेत, उदा. सिंधू - हिंदू, सप्त सिंधू - हप्त हिन्दु, असुरा - अहुरा, सरस्वती - हरश्वती, सोमा - हाओमा इतरही अनेक शब्द आहेत फक्त "स" चा उल्लेख "ह" असा आहे. हिंदू कोण तर सिंधू नदी व त्यापलीकडे राहणारा जो समुदाय आहे तो हिंदू म्हणून ओळखला जातो.  याबद्दल इंडो इराणीअन व इंडो युरोपिअन भाषांचा अभ्यास केल्यास त्याबद्दल माहिती मिळेल.

मध्यपूर्व आशियातील लोक हिंदू म्हणून ओळखत तर ग्रीक व युरोपिअन लोक सिंधू ह्या शब्दाचा उच्चार इंदू असा करत, साहजिकच ते सिंधू नदीला इंदू किंवा इंडस नदी म्हणून संबोधु लागले आणि पुढे ह्या प्रदेशाला इंडिया हे नाव मिळाले.
ह्याबद्दल आणखी सखोल चर्चा किंवा संवाद होऊ शकतो....

प्रशांत कळवणकर

7020388324

Saturday, November 24, 2018

शिवाकडून शिवाकडे ..... (शिव या संकल्पनेमागील शास्त्र)


शिवाकडून शिवाकडे .....
पदार्थाचा सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणु अशी सुरवातीला समजूत होती त्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन व त्याहूनही अतिसूक्ष्म कणांचा शोध लागला, नंतरच्या टप्यात सहा क्वार्क्स चा शोध लागला जे त्याहूनही सूक्ष्म आहेत. तर मग त्याहूनही सूक्ष्म कणाचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही असं शास्त्रज्ञान वाटू लागले, मग सर्वात अंतिम सूक्ष्म कण ज्याला गॉड पार्टीकल असं म्हणतात अस्तित्वात असावा या धारणेला बळकटी मिळत गेली आणि एक नवीन कल्पनासिद्धांत (hypothesis) जन्माला आला तो म्हणजे स्ट्रिंग थेअरी.
या थेअरी नुसार या विश्वातील सर्व पदार्थ एकाच अति अंतिम सूक्ष्म कणांपासून बनले आहे, त्या कणांचे पुनश्च विखंडन होऊ शकत नाही, त्याला कोणी जाळून नष्टही करू शकत नाही. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥' याच अति अंतिम सूक्ष्म कणाला (smallest particle) काही तत्त्ववेत्ते "शिव" म्हणून संबोधू लागले, 'शिव' हे एक प्रतिकात्मक संबोधन आहे ज्याचा ईश्वर या अर्थाशी संबंध जोडला जातो.
शिव म्हणजे मूलकण आणि ह्या मूलकणापासूनच विश्वाची निर्मिती झाली आहे. ह्या मूलकणाला गती देणारी ही शक्ती जी आदी आहे. शिव- शक्ती यांचं मिलन हेच विश्व निर्मितीमागच तात्विक सत्य आहे, शास्त्र आहे, त्याच मूलकणाचा (God Particle) शोध स्वित्झरलँड येथे (LHD) लार्ज हेड्रोन कोलायडर उभारून घेतला जात आहे. शिव हा मूलकण आहे तर शक्ती हे चेतन आहे आणि चेतन- अचेतानाच्या संयोगातूनच पिंड - ब्रम्हाणडाची ची निर्मिती झाली आहे.
पिंड हे ब्रम्हाणडाचं लघु रूप आहे तर अणू हे सूक्ष्म रूप आहे असं मानणारा ही एक वर्ग आहे पण वैज्ञानिक आधार मिळेपर्यंत तो एक कल्पनासिद्धांत (hypothesis) आहे.   ह्याच प्रेरणेतून मी काही वर्षांपूर्वी मुक्तछंदात एक काव्य लिहिले आहे ते मी इथे पोस्ट करतो आहे ......
शिवाकडून शिवाकडे....
अकुल अव्यक्त बिंदुरुपी शिवाचे आदी शक्तीशी मिलन होते,
स्फण्द निर्माण होतात...
निजा .... परा.... अपरा.... सूक्ष्मा.....
अवस्थांतर होत....
व्यक्त-अव्यक्त "शेश" शक्ती जडात प्रकट होते,
माया रूप धारण करते....
अचेतन, चेतनेच्या आधाराने आकार घेते,
अमर्याद विश्वातल्या असंख्य जीवांपैकी....
एक शूद्र जीव... मानव....
नर-मादी, धन-ऋण अशा परस्पर विरोधी शक्तींच्य
मंथनातून जड देह स्थिरावतो...
पाप-पुण्याचा हिशेब करत....
भोग भोगत...
शटचक्रांचा गुंता सोडवत....
परत प्रवास सुरु होतो...
त्याच अकुल, अव्यक्त बिंदुरुपी शिवाच्या दिशेने
अव्याहतपणे.....
जे घडते पिंडात तेच ब्राह्मणडात, जे घडते ब्रम्हाणडात तेच पिंडात....
अव्याहतपणे....
प्रशांत कळवणकर
डी जी पी नगर क्र 1, नाशिक
7020388324

भारतीय समाज : एक विकृत वास्तव ....


भारतीय समाज  : एक विकृत वास्तव ....
आपल्या देशातील काही मुख्य राजकीय पक्षांची उभारणीच मुळात तत्वशील नाही आहे। भा ज पा ची उभारणीच तर मुळात धर्म वादावर झाली आहे (RSS ideology), त्यामुळे सर्वधर्माप्रती सहिष्णुता त्यांच्याकडून अपेक्षित ठेवणे हे शुद्ध मूर्खपणाचे आहे। इथे माणसापेक्षा (अ)धर्मच मोठा झालाय। चला RSS च्या मतानुसार आम्ही हिंदू धर्माची श्रेष्ठता मानू पण हिंदू धर्म म्हणजे काय हे तर त्यांनी स्पष्ट करावे। इथे श्रेष्ठ-कनिष्ठ हा वाद इतका पराकोटीचा आहे की त्याने जनसामान्यांची बुद्धीच भ्रष्ट करून सोडली आहे। माणसातली संवेदनशीलताच नष्ट करून टाकली आहे। प्रत्येकाला त्याच्या जातीचा वृथा अभिमान आहे। माणसापेक्षा जात अन धर्म मोठे झालेत हाच मोठा अधर्म आहे।
इथे ब्राह्मणाला त्याच्या श्रेष्ठत्वाचा अभिमान तर मराठ्यांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान। काही (सर्वच नाहीत) ब्राह्मणांनी देवाच्या, धर्माच्या नावाने घाबरवायचे, भडकवायचे अन आपला स्वार्थ साधून घ्यायचा एवढा एकच धर्म शिल्लक ठेवलाय। तर  मराठा समाजातील काही जण हे विसरले की पराक्रम पूर्वजांनी केला, आपलं कर्तृत्व काय? तर गंजलेल्या तलवारी हातात घेऊन फिरताहेत। खोट्या प्रतिष्ठेपायी लग्न व इतर समारंभात वारेमाप उधळपट्टी करायची अन नंतर  ......
दलित ही आता अवस्था नसून जात बनली आहे। मला एक कळत नाही काही उच्चशिक्षित, उच्चपदस्थ आणि आर्थिक सक्षम असतांना स्वतःला दलित म्हणवून घेण्यात कुठला अभिमान बाळगतात ते। इतर जाती छोटे छोटे संगठण करून उर फाटेस्तोवर छाती फुगवत शक्ती प्रदर्शन करत आहेत। बारा बलुतेदार तर सोळा अलुतेदार (जंगम, जगले, तराळ, कोष्टी, वाघे, पोतराज वगैरे), त्यांच्यातल्या उपजाती व इतर अल्पसंख्याक यांनी भारतीय समाज अक्षरशः छिन्न विच्छिन्न करून सोडला आहे।
फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी महात्म्यांनी कोणत्याही जाती-धर्माचे प्रतिनिधित्व केले नाही। त्या मानवतावादी महान विभूती होत्या। आंबेडकर मुळातच बुद्धिमान व संवेदनशील होते ते कोणत्याही जातीत जन्माला आले असते तरी त्यांच्या हातून सत्कर्मच झाले असते। त्यांनी राज्यघटना भारतासाठी लिहिली, कोणा ठराविक वर्गासाठी नाही! राजाला जात, धर्म नसतो असे म्हणतात याला छत्रपती काही अपवाद नाहीत, मग ते एक वर्गाचे कसे होतात। महात्मा फुलेंनी स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, समाज सुधारणा इत्यादी समाजविधायक कार्यासाठी आयुष्य वेचले मग ते ठराविक वर्गाचे कसे होतात! फुल्यांना वर्ग चालवण्यासाठी एका ब्राह्मणाने भिडे वाड्यात जागा उपलब्ध करून दिली मग सर्वच ब्राह्मण स्वार्थी कसे?
ज्या समूहावर अन्याय झाला त्यांनीच प्रतिकार करायचा बाकीच्यांनी बघ्याची भूमिका घ्यायची हेच भारतीय समाजाचे वास्तव आहे आणि ज्यांनी मूल्यवर्धित आचरण, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वशिक्षणाचा आग्रह धरला असल्या विचारवंतांना सोयीस्कररित्या संपवायचे। कारण आपल्याला जात, धर्म सोडून काही माहितीच नाही। दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश इत्यादींचे आवाज निर्दयीपणे बंद केले जातात, त्यांची हत्या करणाऱ्यांचा साधा सुगावाही लागत नाही, एवढे आपल्याला जाती, धर्माने षंढ बनवले आहे काय?।
सामाजिक एकत्रीकरण (social cohesiveness) हा तर सक्षम लोकशाहीचा पाया आहे। राष्ट्र शक्ती (national power) ठरवताना सामाजिक एकत्रीकरण या गोष्टीचा प्राधान्याने विचार होतो, हाच तर मूळ पाया आहे। कारण जर सर्व मानव समाजात एकात्मता असेल तर नेत्याची गुणवत्ता (quality of leadership) ही त्याच्या सामाजिक बंधीलकीवरून ठरते, त्याच्या जातीवरून ठरत नाही। ह्याचा परिणाम नोकरशाहीचे संघटन आणि त्याची कार्यक्षमता (bureaucratic organization and efficiency) यावर होतो। साहजिकच नैतिक मूल्य बळकट होतात। शिक्षण (मूल्यवर्धित व इतर), शिष्टाचार, शिस्त, संवेदनशीलता, राष्ट्रप्रेम, मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी नैतिक मूल्यांची वृद्धी होते। ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम देशाच्या अर्थकारणावर होतो। अर्थकारण बळकट होते। मानव खऱ्या अर्थाने आचार-विचाराने सुखी व समृद्ध होतो।
मग ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपण सामाजिक स्तरावरची आपली पत गमावली आहे असे नाही का वाटत?
प्रशांत कळवणकर
7020388324

जशी संस्कृती तसे हत्यार .....


जशी संस्कृती तसे हत्यार .....
आम्हाला शाळेत मराठीच्या पुस्तकात बाबा धर्माधिकारी यांचा "जशी संस्कृती तसे हत्यार" हा एक धडा होता। यात त्यांनी लिहिले आहे की ज्यांची संस्कृती प्रगत होती त्यांचे हत्यारेही तेवढीच प्रगत होती आणि त्यामुळे ते इतरांवर राज्य करू शकले। मध्य पूर्वेत "अब्बासीद" खालिफातच्या काळात सर्व प्रांतात इस्लामिक राज्यांनी प्रचंड प्रगती केली। कला, विज्ञान, साहित्य, स्थापत्यकला, चिकित्सापद्धती व इतर क्षेत्रात त्यांनी अनन्यसाधारण यश संपादन केले होते। अर्थात त्यामुळे त्यांची हत्यारेही तितकीच आधुनिक व प्रबळ होती। युद्धकलेचे व नितीचे त्यांचे ज्ञानही अगाध होते। साहजिकच त्यांनी खूप मोठ्या साम्राज्यावर स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित केले। युरोपातील बराचसा भाग त्यांच्या अधिपत्याखाली आला होता।
1526 मध्ये तुर्की योद्धा बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झालेले पहिले पानिपतचे युद्ध हे बाबराच्या युद्धकलेचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल। बाबराने ह्या युद्धात हिंदुस्थानात प्रथम तोफांचा वापर केला होता। ह्या युद्धात बाबराचा विजय झाला। साहजिकच त्याचा विजय झाला तो उत्तम युद्धनीती व आधुनिक हत्यारांमुळेच। त्यानंतर ह्या तुर्की योद्धयांनी, सम्राटांनी जवळपास तिनशेवीस वर्षे हिंदुस्थानावर राज्य केले।
अठराव्या शतकात इंग्लंड मध्ये औदयोगिक क्रांती झाली। ह्या क्रांती बरोबर इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली। ते युद्धात बंदुकीचा वापर करू लागले। युद्धात शिस्तीचं महत्व त्यांनी जाणलं आणि त्यांनी कवायती फौजेची रचना केली। सैनिकांना गणवेश व नियमबद्ध संचलन ही इंग्लंडने जगाला दिलेली एक मोठी देणगीच आहे। साहजिकच सुसंस्कृत व प्रगत इंग्रजांनी तुर्की सम्राटांची व मराठ्यांची सत्ता उलथवून टाकली व पूर्ण हिंदुस्थानचे राज्य एकछत्री अमलाखाली आणले। इंग्लंडच्या प्रगतीचा आलेख आज आपल्यासमोर आहेच। आपल्या प्रगत संस्कृतीच्या जोरावर इंग्रज, फ्रेंच, हॉलंड, जर्मनी इत्यादी यूरोपीय राष्ट्रांनी अख्ख्या जगावर राज्य केले।
इंग्रजांना कच्चा माल मिळवण्यासाठी व पक्का माल विकण्यासाठी हिंदुस्थानच नव्हे तर पूर्ण जगाची बाजारपेठ काबीज करणे गरजेचे होते। त्यामुळे सहजीकच त्यांनी विस्तारवादी धोरणाचा अवलंब केला।
इंग्लंडचे हिंदुस्थानावर राज्य येण्याअगोदर हिंदुस्थान अनेक छोट्यामोठ्या राज्यांमध्ये विभागाला गेला होता, एकसंघ बिलकुल नव्हता। त्यावेळेची हिंदुस्थानची जनता ही अशिक्षित व एकप्रकारे रानटी म्हणता येईल अस आयुष्य जगत होती। काही ठराविक वर्ग जसे राजा, ब्राह्मण, सरदार, जमीनदार व मोठे व्यापारी हे जेमतेम चार ते पाच टक्के लोकं उर्वरित  सामान्य जनतेवर मन मानेल तसं राज्य करीत होती।
समाजतील एक मोठा वर्ग अशिक्षित असल्यामुळे त्याला त्याच्या हक्कांची जाणीव नव्हती। उच्च-नीच ह्या अनैतिक भेदाने तो पछाडला गेला होता। अंधश्रद्धांना जाणीवपूर्वक खतपाणी घातले जात होते। सतीची चाल, नरबळी, देवावरचा (अंध) विश्वास व त्याबद्दलची अनामिक गुद्भीती व इतर अनेक (कु) प्रथा याने सामान्य माणूस अक्षरशः पिचला गेला होता। शिक्षण नसल्यामुळे ब्राह्मण वर्ग आतर्क्यातील भय सामान्य वर्गात निर्माण करण्यात यशस्वी झाला होता। सामान्य वर्ग त्याच्या त्या शोषित अवस्थेला तो त्याचे पूर्व जन्मीच्या पापाचे भोग समजू लागला (किंवा जाणीवपूर्वक त्याच्या मनावर तसा गैरसमज बिंबवला जात होता।) वर्ण व्यवस्था ही गुणकर्मावर  आधारीत न राहाता पिढी परंपरागत बनली। कर्मकांडाला अवाजवी महत्व प्राप्त झाले।
स्त्रीचं आयुष्य तर सर्वच वर्गात (ब्राह्मणसुद्धा) अगदीच दयनीय होत। बालविवाहाची प्रथा, स्त्री शिक्षणाला असलेला सक्त विरोध, अल्पआयुमर्यादा, विधवा तसेच पुनर्विवाहाला समाजाची अमान्यता, कुठल्याही निर्णय प्रक्रियेत भाग घेण्यास समाजाचा सक्त विरोध व इतरही अनेक अशा गोष्टी होत्या ज्यामुळे स्त्रिचं आयुष्य हे नरकातीत झालं होतं।
 सामान्य माणूस स्वतःला पापी समजू लागला होत। ह्या त्याच्या स्थितीला तो स्वतः जबाबदार समजू लागला होता। ईश्वराच्या कोपामुळे आपली ही अशी अवस्था झाली अशी त्याची समजूत ब्राह्मन् वर्गाकडून करून दिली जात होती। त्यातून जर बाहेर पडायचे असेल तर ईश्वराला व त्याचे अधिकृत दलाल म्हणजे  ब्राह्मण यांना शरण जाणे हा एकमेव पर्याय त्यांना उपलब्ध असल्याची जाणीव ब्राह्मण वर्गापासून करून दिली जात होती।
साहजिकच मानवीहक्कांची जाणीव व त्याचे महत्व, संवेवदनशीलता, स्त्री- पुरुष समानता, सार्वजनिक शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, नियोजन, सामाजिक एकात्मता, व्यापाराचे महत्व, शास्त्रातील संशोधन, व्यापारी प्रवृत्ती इत्यादी अनेक गोष्टींनी इंग्रजांची संस्कृती अत्यंत समृद्ध व प्रगत होती। या गोष्टींमुळेच मूठभर इंग्रज त्यांच्यापेक्षा शंभरपट लोकसंख्येवर सहज सत्ता गाजवू शकले.
प्रशांत कळवणकर
7020388324