हिंदू धर्म एक चिकित्सा ..
हिंदु समुदाय हा मुळातच विखुरलेला, दिशाहीन आणि गोंधळलेला आहे. याचाच फायदा स्वतःला धर्माधिकारी समजणारे स्वार्थी लोक घेतात. इतर धर्माचा द्वेष करण्यापेक्षा माझ्या धर्मात काय कमी आहे? याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.
स्वातंत्र्यपूर्व काळात एक राष्ट्रीय अस्मिता म्हणून हिंदू ह्या शब्दाचा धर्म म्हणून झालेला वापर हि तत्कालीन गरज होती, पण हिंदू हा धर्म नाही हे सत्य जास्तकाळ लपून राहू शकत नाही. वेद, उपवेद, ब्राह्मणे, पुराणे, आरण्यके, स्मृतिग्रंथ, उपनिषदे सहा शास्त्रे, रामायण व महाभारत ह्या साहित्यात हिंदू ह्या शब्दाचा सुध्दा साधा उल्लेख देखील नाही. भारतीय भाषा व उप भाषा यामध्येही हिंदू ह्या अर्थाचा शब्द नाही.
हिंदूंचा कोणताही धर्मग्रंथ नाही. आता ज्ञानेश्वरीच्या सुरवातीला जे गणपतीचे सहा हात म्हणजे सहा शास्त्रे सांगितली ती म्हणजे वैशेषिक, न्याय, मीमांसा, सांख्य, योग आणि वेदान्त आता यातील पहिले शास्त्र कणाद मुनींचे 'वैशेषिक' व कपिल मुनींचे 'सांख्य' शस्त्रे हे देव मानत नाहीत तर बाकीचे शास्त्र देव मानतात. म्हणजे कुठलीही एक ठराविक philosophy नाही आहे. वेद लिहिणाऱ्या आर्य लोकांना मूर्तिपूजा मान्य नव्हती पण आज असंख्य मंदिर व मूर्त्यांचे स्तोम माजले आहे. वैदिक हा मूळ धर्म मानला तर मग एकही मंदिर असायला नको. पण जो वेदवाचस्पती म्हणून बिरुद लावून फिरतो तो गणेश याग यज्ञ कसा करतो. इतिहास बघितला तर गणपती ही संकल्पना इस नंतर चवथ्या ते सहाव्या शतकात 'गुप्त' काळात आली. तर गणेश पुराण, मुद्गल पुराण व अथर्वशीर्ष यांची रचना नवव्या ते तेराव्या शतकात झाली. परंतु हा गजानन ईस पूर्व चवथ्या ते आठव्या शतकात व्यासांनी सांगीतलेले महाभारत कसे लिहितो.
आतापर्यंत ह्या हिंदुभूमीत लिखाण झालेले सर्व ग्रंथ एकत्र करायचे आणि त्याला सरळ हिंदू धर्म म्हणायचे ही चुकीची खेळी आहे. बरं हिंदू नावाने जर एकत्र आलो आहोत तर मग एक धर्मग्रंथ तरी बनवा. ज्याला पूर्ण भारतीयांची मान्यता असेल. तसे प्रयत्न होणार नाहीत कारण जाती व्यवस्था आणि अहंगंड इतका रुजलाय की एक ना एक दिवस हिंदू भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही. इथे प्रत्येकाला आपली जातीचा वृथा अभिमान आहे. मराठ्यांच्या पूर्वजांनी पराक्रम केला पण ते आजही स्वतः पराक्रमी असल्याच्या ऐटीत वावरताहेत. इतर जातीचे आप आपल्या छोट्या छोट्या संघटना करून आपल्या हक्कासाठी भांडताहेत. काही दलितांची परिस्थिती सुधारली तरी त्यांना दलित म्हणून घेण्यात अभिमान वाटतो आता दलित ही अवस्था ना राहता जात बनली आहे, बरं ह्या प्रत्येकाने आपला brandambasaador बनवला आहे. छत्रपती हे राजे होते, प्रजाहितदक्ष होते आणि राजाला जात नसते, त्यामुळे त्यांचा जातीशी संबंध येतच नाही, पण मराठ्यांनी त्यांना आपल्या जातीचा brandambassador बनवलाय. सावित्रीबाईं व ज्योतिबा फुले हे द्वयी स्त्रीशिक्षणाच्या झटले, मानव उद्धारासाठी झटले, केवळ माळी समाजासाठी नाही, पण माळी समाजाने त्यांना आपला brandambassador बनवलंय, आंबेडकरांनी दलितोद्धारासाठी काम केलं त्यांनी दलित ही अवस्था बदलावी म्हणून काम केलं पण घटना ही देशातल्या सर्व नागरिकांसाठी लिहिली. त्यात सर्वांचे हित बघितलं मग आंबेडकर केवळ एक समूहाचे कसे काय होऊ शकतात.
ह्या सर्वांचा कारण म्हणजे आपण धर्महीन आणि दिशाहीन आहोत. आपण मूठभर स्वार्थी लोकांच्या कटास बळी पडलो आहोत. मी, आंबेडकरांनी धर्मांतर केलं असं म्हणत नाही तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण धर्मांतर म्हंटल्यावर आधीचाही एखादा धर्म हवा, पण हिंदू हा तर धर्म नाही. मग जो धर्म सर्वांना समानतेची वागणूक देत नाही तो कसला धर्म? बरं ह्या स्वार्थी लोकांनी रामायण, महाभारत ह्या कथा इतक्या प्रभावीपणे बिंबवल्यात की त्या कथा ही गोष्ट कोणी मानायलाच तयार नाहीत. आई सी एस इ च्या नववीच्या पुस्तकात वाल्मीकीचा काळ हा इस. पूर्व पहिल्या शतकातला दिला आहे, म्हणजे रामायणाची निर्मिती ही त्याच काळातली असणार. बरं हनुमान लहानपणी सूर्य गिळायला जातो, तो सुर्याएव्हढा मोठा होतो व अनु एवढा सूक्ष्म होतो, शिवाय तो वानर जातीचा असतो, त्याला डोंगर उचलून उडण्याऐवढी ताकत असते असल्या गोष्टीवर ही अशिक्षित जनता सहज विश्वास ठेवते, त्यांना त्याची चिकित्सा करावीशी नाही वाटतं. आता नाशिकमधल्या एखाद्या माणसाला विचारलं की हनुमानाचा जन्म कुठे झाला तर तो क्षणाचाही विलंब न करता सांगतो की अंजनेरीला झाला, कारण त्याला तेवढंच माहिती आहे. पण मग शोध घेतला तर चूरू(राजस्थान), हम्पी (कर्नाटक) असल्या अनेक ठिकाणी तुम्हाला हनुमान जन्म स्थळ म्हणून माहिती मिळेल. रामायणाच्या माघे काही गुढार्थही असेल पण मग त्याचा तरी शोध लोकांनी घ्यावा. उगाच जशी आहे तशी कथा सत्य मानून का चालता? त्यामुळे रामाचा जन्म अयोध्येला झाला यावर सामान्य लोकांचा सहज विश्वास बसतो. राम हे कथेतील एक पात्र आहे याचा जनता विचार देखील करत नाही.
छत्रपतींनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदू धर्म स्थापनेची शपथ घेतली असती तर त्यांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान कसे असते, तेहतीस अंगरक्षकांपैकी बारा हे मुसलमान कसे असते, बाबा याकूत त्यांचे धर्मगुरू कसे असते, राज्याभिषेकाला गागाभट्टाना काशीहून बोलावण्याची गरज का होती. त्यांनी कधीही जाती धर्माचा पुरस्कार केला नाही. त्यांची राजनीती सर्वांना सामावून घेणारी होती.
उत्तर वैदिक काळापासून मात्र एक वर्ण परंपरा होती, पण ती सर्व हिंदुस्थानला समानता घेऊ शकली नाही व कालांतराने ती परंपरा कर्मानुसार नव्हे तर जन्मानुसार झाली, ठराविक लोकांनी भय दाखवून स्वार्थासाठी तिचा वापर केला. यात यजुर्वेद ब्राह्मण वर्ग प्रामुख्याने आहे. ऋग्वेदी ब्राह्मण वर्ग मात्र शिक्षण व इतर क्षेत्रात प्रामुख्याने आहे, त्यांना फक्त आपल्या जात श्रेष्ठत्वाचा अभिमान आहे. हिंदू हा धर्म म्हणून मागच्या दीडशे वर्षांपासून मिरवला जात आहे.
हिंदू हा सिंधू ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. झेंद अवेस्ता ह्या पारशी लोकांच्या ग्रंथात "स" ह्या शब्दाचा वापर "ह" असा केला गेला आहे. आर्य आणि झरतुष्ट हे मूळ एकाच ठिकाणाहून आलेले त्यामुळे बरेच संस्कृत शब्द झेंद अवेस्ता ह्या ग्रंथात आले आहेत, उदा. सिंधू - हिंदू, सप्त सिंधू - हप्त हिन्दु, असुरा - अहुरा, सरस्वती - हरश्वती, सोमा - हाओमा इतरही अनेक शब्द आहेत फक्त "स" चा उल्लेख "ह" असा आहे. हिंदू कोण तर सिंधू नदी व त्यापलीकडे राहणारा जो समुदाय आहे तो हिंदू म्हणून ओळखला जातो. याबद्दल इंडो इराणीअन व इंडो युरोपिअन भाषांचा अभ्यास केल्यास त्याबद्दल माहिती मिळेल.
मध्यपूर्व आशियातील लोक हिंदू म्हणून ओळखत तर ग्रीक व युरोपिअन लोक सिंधू ह्या शब्दाचा उच्चार इंदू असा करत, साहजिकच ते सिंधू नदीला इंदू किंवा इंडस नदी म्हणून संबोधु लागले आणि पुढे ह्या प्रदेशाला इंडिया हे नाव मिळाले.
ह्याबद्दल आणखी सखोल चर्चा किंवा संवाद होऊ शकतो....
प्रशांत कळवणकर
7020388324

No comments:
Post a Comment