शिवाकडून शिवाकडे .....
पदार्थाचा सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणु अशी सुरवातीला समजूत होती त्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन व त्याहूनही अतिसूक्ष्म कणांचा शोध लागला, नंतरच्या टप्यात सहा क्वार्क्स चा शोध लागला जे त्याहूनही सूक्ष्म आहेत. तर मग त्याहूनही सूक्ष्म कणाचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही असं शास्त्रज्ञान वाटू लागले, मग सर्वात अंतिम सूक्ष्म कण ज्याला गॉड पार्टीकल असं म्हणतात अस्तित्वात असावा या धारणेला बळकटी मिळत गेली आणि एक नवीन कल्पनासिद्धांत (hypothesis) जन्माला आला तो म्हणजे स्ट्रिंग थेअरी.
या थेअरी नुसार या विश्वातील सर्व पदार्थ एकाच अति अंतिम सूक्ष्म कणांपासून बनले आहे, त्या कणांचे पुनश्च विखंडन होऊ शकत नाही, त्याला कोणी जाळून नष्टही करू शकत नाही. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥' याच अति अंतिम सूक्ष्म कणाला (smallest particle) काही तत्त्ववेत्ते "शिव" म्हणून संबोधू लागले, 'शिव' हे एक प्रतिकात्मक संबोधन आहे ज्याचा ईश्वर या अर्थाशी संबंध जोडला जातो.
शिव म्हणजे मूलकण आणि ह्या मूलकणापासूनच विश्वाची निर्मिती झाली आहे. ह्या मूलकणाला गती देणारी ही शक्ती जी आदी आहे. शिव- शक्ती यांचं मिलन हेच विश्व निर्मितीमागच तात्विक सत्य आहे, शास्त्र आहे, त्याच मूलकणाचा (God Particle) शोध स्वित्झरलँड येथे (LHD) लार्ज हेड्रोन कोलायडर उभारून घेतला जात आहे. शिव हा मूलकण आहे तर शक्ती हे चेतन आहे आणि चेतन- अचेतानाच्या संयोगातूनच पिंड - ब्रम्हाणडाची ची निर्मिती झाली आहे.
पिंड हे ब्रम्हाणडाचं लघु रूप आहे तर अणू हे सूक्ष्म रूप आहे असं मानणारा ही एक वर्ग आहे पण वैज्ञानिक आधार मिळेपर्यंत तो एक कल्पनासिद्धांत (hypothesis) आहे. ह्याच प्रेरणेतून मी काही वर्षांपूर्वी मुक्तछंदात एक काव्य लिहिले आहे ते मी इथे पोस्ट करतो आहे ......
शिवाकडून शिवाकडे....
अकुल अव्यक्त बिंदुरुपी शिवाचे आदी शक्तीशी मिलन होते,
स्फण्द निर्माण होतात...
निजा .... परा.... अपरा.... सूक्ष्मा.....
अवस्थांतर होत....
अवस्थांतर होत....
व्यक्त-अव्यक्त "शेश" शक्ती जडात प्रकट होते,
माया रूप धारण करते....
अचेतन, चेतनेच्या आधाराने आकार घेते,
अमर्याद विश्वातल्या असंख्य जीवांपैकी....
एक शूद्र जीव... मानव....
नर-मादी, धन-ऋण अशा परस्पर विरोधी शक्तींच्य
मंथनातून जड देह स्थिरावतो...
पाप-पुण्याचा हिशेब करत....
भोग भोगत...
भोग भोगत...
शटचक्रांचा गुंता सोडवत....
परत प्रवास सुरु होतो...
त्याच अकुल, अव्यक्त बिंदुरुपी शिवाच्या दिशेने
अव्याहतपणे.....
अव्याहतपणे.....
जे घडते पिंडात तेच ब्राह्मणडात, जे घडते ब्रम्हाणडात तेच पिंडात....
अव्याहतपणे....
No comments:
Post a Comment