इस्लाम आणि शास्त्र: भाग १
(तटस्थपणे धर्माची चिकित्सा होताना सहजासहजी दिसून येत नाही। हिंदूंच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये त्यांचे सर्वात कट्टर शत्रू कोण, तर ते मुसलमान। साहजिकच प्रतिक्रियाही त्याच स्वरूपाची तिखट असणार। ह्या धार्मिक वादापालिकडे जाऊन आपण इस्लामबद्दल शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा करण्याचा एक प्रयत्न करू)
अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत। त्यात अन्न ही प्राथमिक मूलभूत गरज आहे। साहजिकच मानव संस्कृती जशी जशी उत्क्रांत होत गेली तसा तसा योग्य व पूरक आहाराचा प्राधान्याने विचार केला गेला। मानवाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून भौगोलीक वातावरण, कच्च्या खाद्यसामुग्रीची व त्यावर प्रक्रिया करन्यासाठी लागणाऱ्या साधनांची सहज उपलब्धता, निसर्गाची अनुकूलता, औषधी, पूरक आहार ह्या व इतर गोष्टींचा आहार-विहार शास्त्रात विचार केला गेला जातो। उत्तम व सुदृढ शरीर जे मानवाच्या सुख संपन्नतेचं द्योतक आहे।
भारतातील वातावरण व आहार : दक्षिण भारतातील वातावरण काहीसे उष्ण तर उत्तर भारतातील त्यामानाने सौम्य व अति उत्तरेकडे आत्यंतिक थंड असे आहे। उष्ण वातावरणात जठराग्नी (पचनशक्ती) हा मंद (क्षीण) तर थंड वातावरणात तीव्र (उत्तम) असतो। त्यामुळे दक्षिण भारतीय लोकांच्या आहारात तांदळापासून बनवलेले पचायला हलके असे अन्न असते। मध्य भारतातील लोकांच्या आहारात गव्हाची चपाती (काहीसे जड) व तांदूळ (काहीसे हलके) आशा मिश्र स्वरूपाच्या आहाराचा वापर केला जातो तर उत्तर भारतातील वातावरण त्यामानाने काहीसे थंड असल्याकारणाने दक्षिण भरतीयांपेक्षा काहीश्या जड अन्नाचा त्यांच्या आहारात समावेश असतो।
इस्लामच्या उगमाचे मूळ हे अरबस्थानातले। अरबस्थान म्हणजेच वाळवंट। वाळवंटी प्रदेशातील मुख्य समस्या म्हणजे खाण्यायोग्य वनस्पतींची व पाण्याची कमतरता व दिवसा प्रखर उष्ण तर रात्री अत्यंत थंड असे प्रतिकूल वातावरण। असल्याही वातावरणात जर मानवाला सहज जगायचे असेल तर काही ठराविक आहार-विहार विषयक नियमांचा अंगीकार करणे बंधनकारक आहे। इस्लाम धर्मात ह्या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे असे दिसते।
आहार : वाळवंटातील जमीन शेतीसाठी अत्यंत निकृष्ठ दर्जाची आहे शिवाय पाण्याची कमतरता। ह्या बाबींमुळे वाळवंटात खाण्यायोग्य वनस्पती सहज उपलब्ध होत नाहीत। साहजिकच खुरटे गवत खाऊन जगणाऱ्या जनावरांचं मांस हा अन्नासाठी एकमेव सहज पर्याय उपलब्ध असतो।
मांसाहार हा पचनासाठी अत्यंत जड। वाळवंटात रात्रीच्या थंड वातावरणामुळे मांस पचनास मदत होते। पण सततचा मांसाहार अनेक व्याधीना जन्म देऊ शकतो। आपल्या पोटातील न पचलेले अन्नाचे कण पोटाच्या तक्रारींना जन्म देतात उदा.पोटात शिल्लक राहिलेल्या (न पचलेल्या) अन्नकणांची सडण्याची क्रिया चालू होते व त्यामुळे वात दोष (gases) निर्माण होतो। वातदोषामुळे तिन्हीही दोष चाळवले जातात व इतरही शारीरिक व्याधी निर्माण होतात। पचनाच्या तक्रारींवर उपाय म्हणून वैद्यकशास्त्र आपल्याला आठवड्यातून एकदा लंघन करण्याचा सल्ला देतं। लंघन केल्याने प्रदीप्त जठराग्नी हा आपल्या आतड्यातील उरलेले अन्नाचे तुकडेही संपवतो व संभाव्य पोटाच्या तक्रारीना प्रतिबंध करतो। 'पोट हे मनाचा आरसा आहे' हे त्यामुळेच म्हंटले जाते।
इस्लाम धर्मात रमादान (रमजान) महिन्यात महिनाभर उपवास (लंघन) करणे हे पवित्र धर्मकार्य मानले केले गेले आहे। वर्षभराच्या सततच्या मांसाहारावर वैद्यकशास्त्रीय दृष्टिकोनातून हा रामबाण उपाय आहे। ह्या उपवासामुळे पोटात शिल्लक राहिलेले मांसाचे कण जठराग्नी भस्मसात करून टाकतो व त्यायोगे पोटाच्या तक्रारी दूर होऊन त्रिदोषांचे दमण होण्यास प्रभावी मदत होते।

खतना कर्म : खतना म्हणजे सुंता हे एक इस्लाम धर्मातील पवित्र शल्यकर्म आहे। ह्या विधीत पुरुष बालकांच्या लिंगाच्या अग्रभागातील त्वचा शरीरापासून वेगळी केली जाते।
कारण: वाळवंटातील वातावरण हे अत्यंत विषम आहे, दिवसां अतिशय उष्ण तर रात्री थंड। असल्या विषम हवामानात जांघेत व परिसरात मुत्राचा काही अंश राहिल्यास बुरशीचा प्रादुर्भाव (fungal infection) होण्याचा संभव अधिक असतो। खतना ह्या विधीमगाचे शास्त्रीय कारण हेच की जांघ प्रदेशात मूत्राचा अंश शिल्लक रहाता काम नये। जेणेकरून बुरशीच्या प्रदूर्भावास प्रतिबंध होईल। असल्या शल्यकर्माचा उल्लेख हिंदूस्थानच्या इतिहासातील महान शल्यविशारद 'शुश्रुत' याच्या ग्रंथातही आढळतो।
उर्वरित भाग क्रमशः पोस्ट केला जाईल।

शास्त्र हा तर धर्माचा मूळ पाया आहे। त्यामुळे मूळ धर्मशास्त्र हे कधीही टाकाऊ होत नसतं। त्यांना शाश्वत नियमांचा आधार असतो। स्थलकालपरत्वे काही नियम बदलतात त्याचाही आपण बुद्धिप्रामान्याने स्वीकार करतोच की।
सदर लिखाण हे माझ्या समजूतीप्रमाणे आहे।
...... प्रशांत कळवणकर
7020388324
7020388324
No comments:
Post a Comment