गणपती, गजानन एक चिकित्सा ....
गणपती अर्थात गजानन, वक्रतुंड, विघ्नहर, सिद्धिविनायक इत्यादी नावाने ओळखले जाणारे महाराष्ट्राचे तसेच भारताचे आराध्य दैवत आहे. भक्तांची विघ्ने दूर करणारा असा देव म्हणून नावलौकिक आहे. कोणत्याही कार्याची सुरवात ही गणेश स्तवणाने होते जेणेकरून सदर कार्य हे निर्विघ्नपणे पार पडेल असा जनसामान्यांचा समज आहे. एखाद्या कार्याची सुरवात करणे म्हणजे श्रीगणेशा करणे हा वाकप्रचारही भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे. गणपतीचा जन्म हा पार्वतीच्या मळापासून झाला अशीही एक अख्यियिका आहे.
आता ह्याच गणरायाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू कारण चिकित्सा करणे हा विज्ञानवादी मानवाचा स्थायीभाव आहे. उपलब्ध माहितीवरून गणेश, गजानन ह्या संकल्पना (गज+आनन(मुख)= गजानन, मुख हत्तीचे आहे आणि धड मानवाचे आहे) इस नंतर चवथ्या ते सहाव्या शतकातील अर्थात गुप्त काळात अस्तित्वात आली. गुप्त काळ हा हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्णकाळ समजला जातो.
संकल्पनेचा उगम ....
गुप्त काळात हिंदू प्रदेशातील नागरिकांनी अनेक क्षेत्रात प्रगती केली होती. परंतू लिखाण साहित्य (लिखान करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू) एक क्षेत्र असे होते की तिथे आजच्या तुलनेत विशेष प्रगती नव्हती. लेखन हा शब्द मूळ संस्कृत धातू (मूळ शब्द) लिख म्हणजे कोरने पासून आला आहे. त्या काळात लाकडाच्या पातळ पट्ट्यांवर कोरून लिहण्याची पद्धत अस्तित्वात होती अर्थातच लिखाण करण्याचे काम आजच्या इतके सुलभ बिलकुल नव्हते. साहजिकच एखादे साहित्य अथवा कुठलेही लिखाण हे काही ठराविक प्रतीत बनायचे व गुरुकुलाच्या विदयार्थ्यांना ते मुखोद्गत करावे लागत असे. ही मुखोद्गत करण्याची परंपरा (oral tradition) अनेक शतके हिंदुस्थानात प्रचलित होती. साहाजीकच उत्तम स्मरणशक्ती हे तुमच्या ज्ञानाचे प्रतीक बनले. स्वसंमोहण शास्त्र (self hypnotism science) ह्या क्षेत्रातही त्यावेळेस अपार संशोधन झाले होते.
प्रत्येक प्राण्यांच्या अंगी काही विशीष्ट गुण असतात जसे कबुतर ह्या पक्षात मार्ग शोधण्याची (nevigation), श्वानच्या अंगी गंध ओळखण्याची एक असीम निसर्गदत्त देणगी आहे त्या अनुषंगाने तत्कालीन विद्वानांच्या एक गोष्ट निदर्शनास आली की हत्ती ह्या प्राण्यांची स्मरणशक्ती ही ह्या भूतलावरील सजीवात सर्वात उत्तम आहे. तत्कालीन विद्वानांनी मग ज्ञानाचे अर्थात उत्तम स्मरणशक्तीचे प्रतीक म्हणून गजाननाच्या मूर्तीची निर्मिती केली मुख हत्तीचे म्हणजे उत्तम स्मरणशक्तीचे प्रतीक व धड मानवाचे. इथे विदयार्थी ज्ञानर्जनाच्या सुरवातीला ध्यान मुद्रेत बसून आणि गजाननाची मूर्ती समोर ठेऊन स्वयंसूचना देत व हत्ती सारखी स्मरणशक्ती आम्हाला लाभो अशी प्रार्थना करत. ज्या स्नातकाला चार वेदांचे अध्ययन करायचे तो मग चार हात असलेल्या गजाननाच्या मूर्ती समोर कल्पून स्वयंसूचना देई व ज्याला सहा शास्त्रांचे अध्ययन करायचे तो सहा हात असलेली मूर्ती समोर ठेऊन स्वयंसूचना देई अथवा प्रार्थना करत असे. ज्याचे ज्ञान उत्तम तो गणाचा (समूह) अधिपती म्हणून ह्या मूर्तीला गणाधिपती किंवा गणपती असे नामाभिदान झाले.
गजाननाचे वाहन मूषक .....
अथर्वशीर्ष (गणपती उपनिषद), गणेश पुराण आणि मुद्गल पुराण ह्या साहित्याची निर्मिती ही नवव्या ते तेराव्या शतकातील आहे. अथर्वशीर्षात गजाननाचे वर्णन करताना काही ओळींचा उल्लेख आहे .....
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् ।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ॥
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।
रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैस्सुपूजितम्॥
इथे मुशकाचा म्हणजेच गणपतीचे वाहन उंदराचा उल्लेख आहे मूषकध्वजम् अर्थात इथे मूषक ध्वजाच्या रुपात आहे. आपल्या ज्ञानाचे मूळ केंद्र म्हणजे साहजिकच आपला मेंदू इथे ह्या ज्ञानच वहन करणारा जो मेंदू आहे तोच मुशकाचा रुपात आहे. आपला मेंदू आणि लंबमज्जा ही रचना मुशकासारखी आहे आणि हाच मूषक ध्वजासारखा भासतो आहे ह्या मेंदूभोवती असंख्य रक्तवाहिन्यांचे जाळे आहे म्हणून रक्तगन्धानुलिप्ताङ्गं असाही उल्लेख आहे. जो वक्रतुंड आणि महाकाय (मोठ्या शरीराचा) आहे त्याचे वाहन हा उंदीर आहे म्हणजेच ज्ञानाची व्याप्ती ही अफाट आहे आता शास्त्रज्ञांनी साडे तेरा अब्ज प्रकाश वर्षे दूर असलेल्या आकाशगंगेचा छायाचित्र घेतले आहे करोडो सूर्याचा शोध लावला आहे, विज्ञानात अनन्य साधारण प्रगती केली आहे पण ह्या प्रचंड बुद्धिमतेचे वाहन करणारा मेंदू हा मुशकासारखा लहान आहे. त्यामुळेच ज्ञानाचे प्रतीक महाकाय गजाननाचे वाहन मूषक आहे जे प्रतिकात्मक आहे.
मोदकच का गजाननाला .....
ह्या पिंड (आपले शरीर) आणि ब्रह्माणडाची रचना एकसारखी आहे अशी तत्कालीन विद्वानांची धारणा होती. पिंडात ही निर्मिती पुरुष आणि स्त्रीच्या संबंधातून होते. अर्थातच पुरुष लिंग आणि स्त्री लिंग म्हणजेच त्याच रूपक शिवलिंग हे उत्पत्तीचे प्रतीक आहे. पिंड आणि ब्रह्मांडात अशासंबंधाद्वारेच परपिंड किंवा ब्रह्मणडाची निर्मिती होते ह्या धरणेला अनुसरून मोदकाचा आकार काहीसा शिवलिंगासरखा आहे अर्थातच हे भोगाचे प्रतीक आहे. मोदक ग्रहण करणे हे एकप्रकारे ब्रह्मज्ञान ग्रहण करणे असे प्रतिकात्मक आहे.
एकदंत ....
गजननाला एकदंत म्हणजे एक दात असलेला म्हंटले जाते कारण हत्तीहा उत्तम स्मरणशक्तीचे प्रतीक आहे परंतु त्याचे सुळे हे त्याचे शौर्याभूषण आहे. हत्तीकडे स्मरणशक्ती आहे परंतु जी तर्कबुद्धी मानवाकडे आहे ती ह्या भूतलावरील अन्य कोणत्याही प्राण्याकडे नाही आणि त्यामुळेच मानव सर्व प्राण्यांत श्रेष्ठ आहे. गजाननाला एकच दात हे त्याच्या तर्कबुद्धीच्या अभावाचे एक प्रतीक आहे.
उजव्या सोंडेचा आणि दाव्या सोंडेचा गणपती....
तत्काळी आर्याची वेद संस्कृती आणि दक्षिणेकडील एक तांत्रिक संस्कृती अस्तित्वात होती व नंतर ह्या संस्कृती एकमेकात मिसळल्या. मनाची एकाग्रता ही ध्यान धारणेसाठी सर्वात महत्वाची आणि ह्यासाठी आसक्तीवर विजय हा आवश्यक असे. वेद मान्य असणारे त्यागातून आसक्तीवर विजय मिळवावा ह्या विचारधारेचे होते तर तंत्र विद्या मानणारे भोगातून आसक्तीवर विजय मिळवावा ह्या विचारधारेचे होते. गीतेत अध्याय १२,श्लोक १२ मधे म्हंटले आहे की ....
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते । ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥
ज्ञानार्जनात ध्यानाचे आणि ध्यानात कर्मफलत्याग अर्थात आसक्ती वर विजय मिळवणे याचे असलेले अनन्यसाधारण महत्व ह्या श्लोकात अधोरेखित केले आहे. परंतु आसक्तीवर कसा विजय मिळवावा हे दोन भिन्न मतप्रवाह होते. तंत्रशास्त्र मान्य असलेले उजव्या सोंडेची गणेशाची तर वेद संस्कृती मानणारे दाव्या सोंडेची गणेशमूर्ती समोर ठेऊन स्वयंसूचना देत. हया भिन्न दिशा हे केवळ भिन्न विचारधारेचे प्रतीक आहे.
पार्वतीच्या मळापासून गणरायाची निर्मिती ...
पदार्थाचा सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणु अशी सुरवातीला समजूत होती त्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन व त्याहूनही अतिसूक्ष्म कणांचा शोध लागला, नंतरच्या टप्यात सहा क्वार्क्स चा शोध लागला जे त्याहूनही सूक्ष्म आहेत. तर मग त्याहूनही सूक्ष्म कणाचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही असं शास्त्रज्ञान वाटू लागले, मग सर्वात अंतिम सूक्ष्म कण ज्याला गॉड पार्टीकल असं म्हणतात अस्तित्वात असावा या धारणेला बळकटी मिळत गेली आणि एक नवीन कल्पनासिद्धांत (hypothesis) जन्माला आला तो म्हणजे स्ट्रिंग थेअरी.
या थेअरी नुसार या विश्वातील सर्व पदार्थ एकाच अति अंतिम सूक्ष्म कणांपासून बनले आहे, त्या कणांचे पुनश्च विखंडन होऊ शकत नाही, त्याला कोणी जाळून नष्टही करू शकत नाही.
'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥'
याच अति अंतिम सूक्ष्म कणाला (smallest particle) काही तत्त्ववेत्ते "शिव" म्हणून संबोधू लागले, 'शिव' हे एक प्रतिकात्मक संबोधन आहे ज्याचा ईश्वर या अर्थाशी संबंध जोडला जातो.
शिव म्हणजे मूलकण आणि ह्या मूलकणापासूनच विश्वाची निर्मिती झाली आहे. ह्या मूलकणाला गती देणारी ही शक्ती जी आदी आहे. शिव- शक्ती (पार्वती) यांचं मिलन हेच विश्व निर्मितीमागच तात्विक सत्य आहे, शास्त्र आहे, त्याच मूलकणाचा (God Particle) शोध स्वित्झरलँड येथे (LHD) लार्ज हेड्रोन कोलायडर उभारून घेतला जात आहे. शिव हा मूलकण आहे तर शक्ती (पार्वती) हे चेतन आहे आणि चेतन- अचेतानाच्या संयोगातूनच पिंड - ब्रम्हाणडाची ची निर्मिती झाली आहे.
पिंड हे ब्रम्हाणडाचं लघु रूप आहे तर अणू हे सूक्ष्म रूप आहे असं मानणारा ही एक वर्ग आहे पण वैज्ञानिक आधार मिळेपर्यंत तो एक कल्पनासिद्धांत (hypothesis) आहे. शिव पार्वतीच्या मिलणातून म्हणजे मुलकणांच्या संयोगाने जी पहिली शक्ती निर्माण झाली ती निजा, त्यानंतर परा, अपरा, सुक्ष्मा ह्या अदृश्य शक्ती आणि त्यानंतर ज्या जड देहाची (physical body) निर्मिती झाली ती व्यक्त कुंडलिनी ह्या शक्तीमुळे. जड देहाच्या निर्मितीला पार्वती म्हणजे मूळ शक्तीकण (energy particle) मूलतः कारणीभूत आहे. ह्या जड देहामुळेच मेंदूचीही निर्मिती झाली आणि मेंदूमुळेच आपल्याला आपल्या ज्ञानाची आणि त्याद्वारे अस्तित्वाची संवेदना आहे. हा जडदेह म्हणजेच प्रतिकात्मक पार्वतीचा मळ आहे गणपती आहे.
त्यामुळे गणपतीला नवस करणे, दानपेटीत पैसे टाकणे, अनावश्यक भीती बाळगणे, गणेश याग यज्ञ करणे इत्यादी हे मानसिक आजाराचे द्योतक आहे.
प्रशांत कळवणकर
7020388324

No comments:
Post a Comment